Opening Hours : Monday to Saturay - 8 Am to 5 Pm
महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पशू संवर्धन दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र चालू केलेले आहे. त्या अंतर्गत भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल, गीर, राठी, थारपारकर, लाल सिंधी इत्यादी दुधाळ गाईंचे तुलनात्मक संशोधन होणार आहे. त्या अंतर्गत विविध गाईंचे प्रात्यक्षिक युनिट उभारून शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याच बरोबर चारा उत्पादन, पशुखाद्य, मुरघास, अजोला, औषधी वनस्पतींचा वापर, होमिओपॅथी इत्यादी गोष्टींचा अभ्यास या संशोधन केंद्रावर होणार आहे. बायोगॅस, गांडूळ खत व शेण व गोमूत्र आधारित विविध प्रकारचे खते व वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण सुद्धा शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे..
शेतकऱ्यांची नोंदणी
शेतकऱ्यांकडून चौकशी
प्रशिक्षण पूर्ण केलेले शेतकरी
प्रशिषक / तज्ञ
१. देशी गायीचे बाहेर ठिकाण तंत्र वापरून संवर्धन करणे व त्यामध्ये अनुवांशिक सुधारणा घडवून आणणे.
२. देशी गाय प्रात्यक्षिक युनीट-कम-प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे.
३. स्थानिक गायींच्या अनुवांशिक सुधारण्यासाठी अभिजन देशी बैलांचे वीर्य डोस पुरवठा करणे.
४. प्रशेत्रावर लैगिक क्रमवारी लावलेले वीर्य,गर्भ हस्ततरण सारखे प्रगत तंत्रज्ञान वापरणे आणि जेके ट्रस्ट सारख्या आउट-सोर्सिग एजन्सीच्या सोबत काम करणे.
५. देशी गायींच्या जातीचे प्रजनन,उत्पादन व पुनरुत्पादन इ.कामगिरीचा सखोल अभ्यास करणे.
६. गायींच्या आवश्यकतेनुसार वैज्ञानिक पशू खाद्य निर्मिती व त्यामधील पोषक तत्वांचा अभ्यास करणे.
७. गायीपासून निर्मित जैव-कचरा वापरून उर्जा उत्पादनासाठी बायो-गस आणि सौर प्रकल्प स्थापन करणे.
सदर प्रशिक्षण मला खूप फायदेशीर झाले.मला या मुळे योग्य निर्णय घेऊन खर्चाची बचत करता आली.
मला करोना काळात नवीन व्यवसाय निवडताना या प्रशिक्षणाचा फायदा झाला.डेरी चा व्यवसाय योग्य रीतीने करू शकतो असा आत्मविश्वास तयार झाला.
शेतकऱ्यांसाठी योग्य असे प्रशिक्षण आहे असे मला वाटते.योग्य व अनुभवी प्रशिषक असल्यामुळे पुढील काळात चांगले मार्गदर्शन मिळेल याची खात्री
प्रकल्पाची प्रशिषण विषयाची माहिती :-